अपूर्ण व सदोष बांधकामामुळे टोलवसुलीची अंमलबजावणी केली जाऊ नये -खासदार विनायक राऊत यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
मुंबई-गोवा महामार्ग एनएच-६६ रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पॅकेज तळगाव कलमठ विभाग अंतर्गत असलेल्या अपूर्ण व सदोष बांधकामामुळे टोलवसुलीची अंमलबजावणी केली जाऊ नये. अशी मागणी लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे केली आहे
खासदार राऊत यांनी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिले आहे. यामध्ये म्हटले आहे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळगाव ते कलमठ पर्यंत एनएच ६६ च्या पॅकेज अंतर्गत महामार्गाचे काम अद्याप संपूर्ण झालेले नाही.
www.konkantoday.com