सत्कोंडी गावातील मोर्ये कुटूंबियांतील मुलानी आईचे श्राद्धाच्या निमित्ताने समाजासमोर ठेवला वेगळा आदर्श
रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी या गावी मुलांनी आपल्या आईचे बारावं श्राद्ध कृषीदिनाचं औचित्य साधून गावातील सर्व कुटुंबांना व नातेवाईकांना वेंगुर्ला ४ काजूचे एक एक रोप देऊन अनोख्या पद्धतीने संपन्न केले. आणि समाजापुढे आदर्श निर्माण केला.
रत्नागिरी ह्युमन राईट तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अरूण मोर्ये यांच्या मातोश्री कै. प्रतिभा तुकाराम मोर्ये यांचे वीस जून रोजी उपचारा दरम्यान आकस्मिक निधन झाले होते.
प्रतिभाताई या आदर्श महिला मंडळ सत्कोंडीच्या अध्यक्षा व ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीच्या माजी सदस्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुलगे , एक मुलगी, सूना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे बारावे श्राद्ध होते कोवीड १९ च्या पार्श्र्वभूमीवर घरगुती स्वरूपात हे कार्य करून त्यानिमित्त गावातील प्रत्येक कुटूंबाला व नातेवाईकांना प्रत्येकी एक एक वेंगुर्ला ४ काजूचे रोप देऊनदोनशे रोपांचे वाटप केले व एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला
www.konkantoday.com