संगमेश्वर बाजारपेठेसह जवळच्या ४८ गावातील १२६ पथदीप महावितरणने कारवाई करत बंद केले
ग्रामीण भागासह बाजारपेठांतून रात्रीच्या वेळी पादचार्यांना मार्ग दाखवणार्या पथदीपांची बिले ग्रामपंचायतीने न भरल्याने महावितरण संगमेश्वर शाखेने कारवाई करत पथदीप बंद करण्यास सुरूवात केली आहे. संगमेश्वर बाजारपेठेसह जवळच्या ४८ गावातील १२६ पथदीप महावितरणने कारवाई करत बंद केले आहेत.
ग्रामीण भागांसह बाजारपेठेतून वसलेल्या पथदीपांचे बिल भरण्यासाठी पूर्वी अनुदान मिळत असे. त्या अनुदानातून पथदीपांची बिले भरली जात असत.
www.konkantoday.com