वन विभागातर्फे ‘रत्नागिरी जिल्ह्यातील फुलपाखरांची जैवविविधता, संवर्धन आणि उद्यान निर्मिती’ वेबिनार

*चिपळूण येथील वन विभाग रत्नागिरी (चिपळूण) आणि मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट यांचे संयुक्त विद्यमाने देवरुख (संगमेश्वर) येथे, परसदारी फुलपाखरू उद्यान ही संकल्पना यशस्वी करणारे वन्यजीव अभ्यासक प्रतिक मोरे यांचे ५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ‘रत्नागिरी जिल्ह्यातील फुलपाखरांची जैवविविधता, संवर्धन आणि उद्यान निर्मिती’ या विषयावर महत्त्वपूर्ण वेबिनार व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
मोरे यांनी महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्थेच्या सहकार्याने साद निसर्गाची अंतर्गत याच विषयावर विशेषांक लेखन केले असून ते गेली ७ वर्षे यावर अभ्यास करत आहेत. मानव प्राणी संघर्ष, देवराई संवर्धन, हॉर्नबील, कोकणातील सड्यांची जैवविविधता यावर संशोधन सुरु असलेले मोरे या वेबीनार मधून ‘फुलपाखरांचे विश्व’ उलगडून सांगणार आहेत.
फुलपाखरं हा निसर्गाने निर्माण केलेला एक अद्भुत अविष्कार आहे. विविध आकार आणि रंगांच्या फुलापाखरांना कॅमेऱ्यात पकड़णंही कठीण असतं. रंगीबेरंगी फुलपाखरांची छायाचित्रे टिपण्यासोबत व त्यांचा अभ्यास करण्यासाठी मोरे यांनी आपल्या घराजवळ फुलपाखरांसाठी उद्यान तयार केले आहे. घराजवळ किंवा परसबागेत कोकणी माणूस हमखास काम करतो. तो घराजवळ नारळ, पोफळी, केळी, मोगरा, अबोली, जास्वंदी, गुलाब लावतो. या झाडांत आणखी काही विशिष्ठ फुलझाडे लावली तर फुलपाखरु उद्यान तयार होऊ शकतं, असे मोरे सांगतात. फुलपाखरांना जगण्यासाठी झाड़ आणि उन्ह-सावली आवश्यक असते. म्हणून फुलापाखरांसाठी बागेत थोडं उन, थोड़ी सावली, थोड़ा दमटपणा आणि पाण्याची सोय एवढ्या गोष्टी असायला हवी. यामुळेच मोरेंच्या घराभोवती पिंगा घालणारी फुलपाखरं हा परिसरातील अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे.
ह्या वेबीनारमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व पर्यावरण आणि फुलपाखरू प्रेमी जिज्ञासूंनी Video call link: https://meet.google.com/ccm-nfmg-gfs ह्या लिंकद्वारे या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ दिनांक ५ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत घ्यावा असे आवाहन रत्नागिरी जिल्ह्याचे विभागीय वनाधिकारी दीपक खाडे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button