पीएम केअर फंडात हजारो कोटी जमा , मृतांच्या नातेवाईकांना मदत द्या शिवसेनेची मागणी
महामारी म्हणून जबाबदारी झटकू नका, पीएम केअर फंडात हजारो कोटी जमा आहेत. मृतांच्या नातेवाईकांना मदत द्या, अशी आग्रही आणि रास्त मागणी शिवसेनेने आजच्या सामना अग्रलेखातून केली आहे.कोरोना युद्धात अनेक डॉक्टर्स, शिक्षक, सरकारी पोलिसांनी कर्तव्य बजावताना प्राण गमावले आहेत. असंख्य पत्रकार या संकटांचे वार्तांकन करताना मरण पावले आहेत. त्यामुळे यास फक्त महामारी म्हणून सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही.
www.konkantoday.com