तुम्हाला कितीही मोह पडला तरी सवतकडा धबधब्याजवळ जाऊ नका
कोकणात पावसाळा सुरू झाला की अनेक धबधबे प्रवाहीत होतात पावसाळ्यातील ही धबधबे पर्यटकांचे मोठे आकर्षण असते वर्षा सहल म्हणजे मोठी पर्वणी असते परंतु सध्या कोरोनामुळे अनेक जण या आनंदाला मुकत आहेत
चिपळूण शहरापासून अगदी जवळ म्हणजे ५ किलाेमीटर अंतरावर असलेल्या सवतसडा कडा व त्यावरून पावसाळ्यात पडणारा सुंदर धबधबा आहे. येथे मुंबई – गोवा महामार्गावरुन जाणारे प्रवासी व स्थानिक पर्यटनप्रेमी पावसाळ्यात आकर्षित होतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिपळूण पोलिसांनी या धबधब्याचा मार्ग बंद केला आहे.
मुंबईकडून चिपळूणला येताना महामार्गाच्या डाव्या बाजूला हा धबधबा उंचावरून कोसळताना दिसतो. सवतसड्याच्या धबधब्याखाली भिजण्याची मजा लुटण्यासाठी शनिवारी, रविवारी येथे पर्यटकांची गर्दी असते. जुलै ते ऑक्टोबर या काळात धबधब्याला भरपूर पाणी असते. मात्र, पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह खूप जोरात वाहत असतो.काही दिवसांपासून येथे गर्दीचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये केवळ स्थानिक नसून, मुंबई – गोवा महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासीही हजेरी लावत आहेत. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून येथील पोलिसांनी या धबधब्याचा मार्गच बंद केला आहे. तसेच धबधब्याच्या परिसरात कोणी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा फलकही उभारला आहे.
www.konkantoday.com
पहा सवतकडा धबधब्याचा व्हिडिओ…