
चिपळूण – कऱ्हाड मार्गावर पाईपलाईनसाठी खोदून ठेवलेला खड्डा गेले दोन महिने जैसे थे परिस्थितीत असल्याने वाहतूक कोंडी
चिपळूण येथील बहादूरशेख नाक्यावरील चौकात चिपळूण – कऱ्हाड मार्गावर पाईपलाईनसाठी खोदून ठेवलेला खड्डा गेले दोन महिने जैसे थे परिस्थितीत असल्याने येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. एखादा मोठा अपघातही होण्याची शक्यता आहे.
शहरातील पाण्याच्या पाईपलाईनसाठी महामार्ग विभागाने हा खड्डा खोदून ठेवला असल्याने नगर परिषदेचाही नाईलाज झाला आहे. मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून, बहादूरशेख ते शिवाजीनगर या उड्डाणपुलाचे कामही युद्धपातळीवर सुरू ठेवण्यात आले आहे.
www.konkantoday.com