
इंटरनेट कनेक्शनचे पोल चोरणारे चोरटे गजाआड
इंटरनेट कनेक्शनचे पाेल चोरणारे चोरटे चोरी करण्यासाठी परत आले आणि पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले गुहागर तालुक्यातील रानवी येथे काही दिवसांपूर्वी इंटरनेट कनेक्शन टाकण्यासाठी जे पोल वापरण्यात येतात, ते ८लाख ५४हजार रुपये किमतीचे १५५पोल चोरीला गेल्याची घटना घडली होती.
या घटनेचा तपास करताना हे चोर पुन्हा कोकणात चोरी करण्यासाठी आले आहेत, अशी माहिती मिळाली. त्याचवेळी गुहागर पोलिसांनी सापळा रचून या चार आरोपींना पकडले. चोरी करण्यासाठी आले असता संगमेश्वर तालुक्यातील एका ठिकाणी पोलिसांच्या जाळ्यात हे चोरटे सापडले.
www.konkantoday.com