
सिंधुदुर्ग एसटी विभागाने मालवाहतुकीमधून चौदा महिन्यांत कोटींच्यावर उत्पन्न मिळविले
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात सुरू झाला आणि
गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्यापासून एसटीच्या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला खो बसला. दरदिवशी काही कोटींमध्ये उत्पन्न घेणार्या एसटी महामंडळाला मोठा फटका बसला. मात्र, संकटातही संधी चालून येते, असे म्हटले जाते. एसटी महामंडळाने या महामारीच्या संकटात मालवातुकीचा पर्याय निवडला आणि या संकटकाळात मालवाहतुकीने एसटीला हात दिला. सिंधुदुर्ग विभागाचा विचार करता गेल्या १४ महिन्यांत वेगवेगळ्या प्रकारच्या मालवाहतुकीतून या विभागाला १ कोटी ३९ लाख ७३हजार ७१५रुपये उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे एसटीच्या या मालवाहतुकीला आता मागणीही वाढू लागली आहे.
www.konkantoday.com
