रत्नागिरी जिल्हा परिषदेचा सोलार प्रकल्प आणखी अडचणीत,पहिल्या पावसात सोलर पॅनल उडाली
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वीज बिलात मोठी बचत व्हावी या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीवर १३० किलो वॅट क्षमतेचा सोलर विद्युत संच बसविण्यात आला मात्र याची उभारणी होऊनही हा प्रकल्प चालू होत नसल्याची ओरड असतानाच आता पहिल्या पावसाचा सोलर प्रकल्पाला दणका बसला आहे या सोलर विद्युत संचाचे सोलर पॅनलच वा-याने उडाली आहे प्रकल्प सुरू होण्याआधीच ही अवस्था असेल तर पंचवीस वर्षांची गॅरंटी देणारा हा प्रकल्पाच्या कामाबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमा अंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य इमारतीवर हा सोलर विद्युत संच बसविण्यात आला आहे. जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत हे काम करण्यात आले होते. दिनांक ८ डिसेंबर २०२० रोजी या कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. मार्च २०२१ ला हे काम पूर्ण झाले.मात्र तरीदेखील हा प्रकल्प सुरू झाला नव्हता
www.konkantoday.com