पाली बाजारपेठेमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा भंग करणा-यांविरुद्ध कारवाई

पाली बाजारपेठेमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा भंग करणा-यांविरुद्ध पाली पोलीस दुरक्षेत्राच्या कर्मचा-यांनी दंडात्मक कारवाई केली. या अचानक झालेल्या कारवाईने विनाकारण फिरणा-या दणका बसत आहे.त्यावेळी काही जण विना मुखपट्टी फिरत असल्याने त्यांच्यातील ६ जणांवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांतर्गत कारवाई करत ३००० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. तर ४ जणांविरुद्ध विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरल्या बद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १०६ वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करत तीस हजार रुपयांचा दंड थोठावण्यात आला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button