
तुम्हाला हे जमत नसेल, तर आम्हाला सांगा,’राज्य शासनाला मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा
देशातील कोरोना व्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व राजकीय कार्यक्रमांना आवर घालण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे.
‘तुम्हाला हे जमत नसेल, तर आम्हाला सांगा,’ असा इशाराही न्यायालयानं राज्य सरकारला दिला आहे.
“नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून झालेलं आंदोलन असो किंवा इतर कोणतंही राजकीय आंदोलन, अशा प्रकारच्या राजकीय कार्यक्रमांना राज्य सरकारनं परवानगी देऊ नये,” असं न्यायालयाने म्हटल आहे
www.konkantoday.com
