
चिपळूण शहरातील सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तिघांना अटकपूर्व जामीन
चिपळूण शहरात सावकारी कर्जावर ज्यादा रक्कम वसूल केल्याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात तिघांवर गुन्हा दाखल केला होता. या तिघांनी जिल्हा न्यायालयामध्ये अंतरिम अटकपूर्व जामीनसाठी केलेला अर्ज मंजूर केला आहे.
पूजा मिरगल, चांगदेव खंडझोडे, शिवा खंडझोडे अशी त्यांची नावे आहेत.
या तिघांवर खंडणी मागितल्या प्रकरणी, तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियमाप्रमाणे चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल झाल्याने या तिघांनी चिपळूण येथील जिल्हा न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनाकरिता अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जावर सुनावणी होऊन तो मंजूर झाला आहे. या तिघांच्यावतीने चिपळूण येथील जिल्हा व अति सत्र न्यायालयामध्ये ॲड.नितीन केळकर, ॲड. सोहम भोजने, ॲड. ऋषिकेश थरवळ यांनी काम पाहिले.
www.konkantoday.com