
खेडमध्ये डेंग्यु व काविळची साथ, आरोग्य विभागात खळबळ
रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असतानाच सध्या डेंग्यु व काविळ साथीचा फैलाव सुद्धा झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
खेड तालुक्यात डेंग्यु व काविळ रूग्ण वाढत असतानाच आता खेड शहरातही रूग्णसंख्या वाढत आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अपुरी सुविधा असल्याने हे रूग्ण खाजगी वैद्यकीय तपासणीसाठी जात असताना त्यांना तेथे शासकीय नियमांचे अडथळे येत असल्याचे रूग्ण सांगतात.
www.konkantoday.com
