कोरोनाच्या प्रादुर्भावाने राजापूर तालुक्यातील पितृछत्र हरपलेल्या मुलांपैकी सोळा मुलांना माय राजापूरने मदतीचा दिला हात

कोरोनाच्या प्रादुर्भावाने राजापूर तालुक्यातील पितृछत्र हरपलेल्या मुलांपैकी सोळा मुलांना माय राजापूरने मदतीचा हात दिला. तसेच धारतळे कोविड सेंटरलाही वस्तूरूपाने मदत केली. या सोळा मुलांच्या पर्यंत महीनाभराचे अन्नधान्य, शालेय साहीत्य , रोख रक्कम या स्वरूपात मदत पोहोचवण्यात आली. या साठी मदत फेरी आखण्यात आल्या पहिल्या फेरीत उन्हाळे येथील सोडये कुटुंबीयांना व कोंडये येथील कांबळे कुटुंबीयांना मदत करण्यात आली तर दुस-या फेरीत पेंडखले येथील निनावे , वडदहसोळ येथील पळसमकर , वडवली येथील पांचाळ कुटुंबीयांना मदत दिली गेली. शेवटच्या तिस-या फेरीत भालावलीचे खानविलकर तर बेनगी आडीवरे येथील वारिक कुटुंबीयाना माय राजापूर संस्थेने मदत केली . माय राजापूरच्या सर्व सदस्यांनी स्वतः कडील रक्कम या कुटुंबीयांच्या मदत निधीत जमा केली एकूण रू.87000/- रूपये या मदत कार्यासाठी खर्च करण्यात आला यात कोविड सेंटर धारतळे ला दिलेल्या मदत निधीचा देखील समावेश आहे. अकस्मात ओढवलेल्या या प्रसंगातून प्रत्येक कुटुंबाला मानसिक आधार देण्याची गरज आहे.अनेक कुटुंबाची या कोरोनाच्या आघाताने फरफट झाली आहे. घरातील एकमेव कमवती व्यक्तीचा अचानक मृत्यू पावल्याने कुटुंबाला फार मोठा मानसिक धक्का बसला आहे. या धक्कातून त्यानी सावरावे व आपल्या संसाराचा गाडा पुन्हा रुळावर आणावा यासाठी माय राजापूर संस्थेचे सदस्य त्यांच्या घरी जाऊन समुपदेशन करत होते. पती आपल्याला सोडून गेला.. पदरात तीन तीन मुली आहेत. आता आपले कस होणार म्हणून विवंचनेत असलेल्या मातांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी माय राजापूरने मानशास्राच्या प्राध्यापिका सौ. दिपा ढेकणे यांची मदत घेतली... यासाठी माय राजापूरच्या सर्व महीला सदस्यानी पुढाकार घेतला व या हताश झालेल्या मातांना धीर देण्यासाठी त्यांच्याशी सतत संपर्क देखील राखला. आज माय राजापूर ने अजाण बालक मदत निधीच्या पहील्या टप्प्याची सांगता केली. यापुढेही अश्या अजाण बालकांना मदत करण्याचा मानस माय राजापूर संस्थेचे प्रवर्तक प्रदीप कोळेकर व अध्यक्ष जगदीश पवार यांनी बोलून दाखवला.मदत कार्यात माय राजापूरच्या नरेश दसवंत, प्रकाश परवडी , भोसले मॅडम , पंडीत मॅडम , ऋषीकेश कोळेकर दत्तप्रसाद सिनकर या सदस्यानी प्रत्यक्ष सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button