अखेर तिवरे धरणग्रस्त १० कुटुंबियांना सोडत पद्धतीने मिळाली घरे
तिवरे भेंदवाडीबाधीत १० कंटेनरमध्ये राहणार्या कुटुंबियांस काल मंगळवारी सोडत पद्धतीने घरे वाटप करण्यात आली. सोडतसाठी चिठ्ठी काढण्याचा मान धरणग्रस्त असलेल्या चिमुकल्या रूद्र रंजित चव्हाण याला मिळाला.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसिलदार जयराज सुर्यवंशी, अलोरे पोलीस ठाण्याचे एपीआय संदीप पाटील, उपसभापती प्रतापराव शिंदे, जि.प. सदस्य विनोद झगडे, मंडल अधिकारी संदेश आयरे, प्रकाश सावंत, मंगेशराव शिंदे, अजित चव्हाण, संतोष कनावजे, तानाजी चव्हाण आदी मंडळी उपस्थित होती. काल घराच्या सोडतीनुसार कृष्णा बाळ कातुर्डे, संतोष पांडुरंग कनोजे, तुकाराम शंकर कनावजे, राधिका गोविंद चव्हाण, लक्ष्मी शिवराम चव्हाण, बळीराम कृष्णा चव्हाण, शिवाजी नंदराम चव्हाण, भगवान गणपत घाडगे, सखाराम धोंडू तांबट, नारायण रघुनाथ गायकवाड यांना या सिरीयलप्रमाणे घरे मिळाली. नवीन घरे मिळाल्याने या नागरिकांनी समाधान व्यक्त केले. लवकरच या घराचे लोकार्पण होणार आहे.
www.konkantoday.com