राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना आमदारांना पक्षाकडून व्हीप

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ व ६ जुलै असे दोनच दिवस घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आमदारांना अधिवेशन संपेपर्यत आमदारांनी सभागृहात उपस्थित राहवे, असा व्हिप आपल्या आमदारांना बजावला आहे.
शिवसेनेकडून मंगळवारी आपल्या आमदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी करण्यात आला आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, “राज्याचे पावसाळी अधिवेशन पाच आणि सहा जुलैला होत आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करून मंजुर करण्यात येणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात आमदारांनी संपूर्ण दिवस उपस्थित रहावं असा पक्षादेश आहे”.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button