मुंबई विद्यापीठात आता मराठीतून इंजिनीअरिगचे शिक्षण
केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाची विद्यापीठांमध्ये अमंलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यापीठात आता या धोरणानुसार शैक्षणिक रचनेत अमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. यामध्ये विविध विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांना विशेष ओळख प्राप्त व्हावी आणि एका छत्राखाली यावे यासाठी ‘स्कूल संकल्पना’ राबविण्यात येणार असून यासाठीच हा महत्त्वाचा निर्णय विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठात आता मराठीतून इंजिनीअरिगचे शिक्षण देण्यास परवानगी देण्यात आली असल्याने येत्या काळात राज्यातील इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाचे स्वरूपच बदलले जाणार आहेमुंबई विद्यापीठात या शैक्षणिक वर्षांपासून विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात होत आहे. विद्यापीठ पातळीवर विविध विषयांना एका छत्राखाली आणण्यासाठी स्कूल संकल्पना राबवली जाणार आहे. विविध विद्याशाखाअंतर्गत असणाऱ्या विषयांची ओळख आणि ते विषय शिकण्याची संधी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकणार आहे.
www.konkantoday.com