मुंबईतील बनावट लसी प्रकरणातील टोळीने नागरिकांना दिले होते लसी ऐवजी चक्क सलाईन वॉटर
कोरोनाच्या नियंत्रणासाठी लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. मात्र, मुंबईतील बनावट लसीकरणाच्या प्रकरणाने राज्यसह देशभरात खळबळ उडवून दिली. बनावट कोरोना लसीकरणाप्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणातील तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले असल्याचे सांगितले जात आहे. या बनावट लसीकरणात नागरिकांना चक्क सलाईनचे पाणी दिले गेल्याचे समोर आले आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीच्याऐवजी मिठाचे पाणी (सॅलाइन वॉटर) देण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासातून पुढे येत असल्याचे सांगितले जात आहे.
www.konkantoday.com