भोके गावामधे कोरोना जनजागृती करत महिलाशक्तीने दाखविली कार्यतत्परता
भोके गावामधे ग्रामपंचायत भोके, आदर्श ग्रामसंघ व संकल्प ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच कोरोना जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. सदर रॅलीमधे कोव्हीड - 19 व लसीकरणाबाबत ग्रामस्थांचे उद्बोधन करण्यात आले. भोके गावच्या *उपसरपंच सौ. मनस्वी मंगेश जाधव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या रॅलीसाठी *सरपंच श्री. श्रीपत गणू मायंगडे, ग्रामसेविका श्रीम. सरस्वती भिकाजी मोटे, आरोग्यसेविका श्रीम. मंगला ठिक, ग्रामपंचायत सदस्या सौ . रिया राजन आंबेकर, दिशा दिलीप आंबेकरहे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच या रॅलीसाठी बचतगटांचे व ग्रामसंघांचे प्रतिनिधी म्हणून *सौ.प्राप्ती आंबेकर , सौ. संजीवनी आंबेकर, सौ. अर्पिता मायंगडे, सौ.समीक्षा चव्हाण, सौ. देवरुखकर, सौ भारती मायंगडे , सौ. सानवी पानगले या महिलांदेखील प्रत्यक्ष उपस्थित होत्या. सदर रॅलीची सुरुवात भोके आंबेकरवाडी येथून करण्यात येवून रेवाळेवाडी येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या जनजागृती रॅलीसाठी दोन्ही ग्रामसंघांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले. भोके गावातील कोरोना लसीकरणाबाबत असलेली उदासिनता लक्षात घेता, महिलांनी स्वतःहून पुढाकार घेवून आयोजित केलेल्या या जनजागृती रॅलीचे अनेक ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.
www.konkantoday.com