नरवण येथे गोवा बनावट मदयाचा साठा मोठा साठा जप्त
राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाची मोठी कारवाईगुहागर तालुक्यातील नरवण व बो-या येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापाटाकून 747560/- रू.किमतीचा गोवा बनावट विदेशी मदयाचा मुददे माल जप्त केला. गुहागर तालुक्याती नरवण येथेगोवाबनावटविदेशीमदयाचा साठा केला असल्याची माहीती प्र.अधिक्षक व्ही.व्ही.वेदय यांना खुब-यामार्फत मिळाली होती या नुसार विभागीय उपआयुक्त वाय.एम.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामिण व भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी नरवण येथुन गोवा बनावट गोल्डन एम व्होरकीचे 25बॉक्स,महाराष्ट्र बनावटीच्या मदयाचे 01 बॉक्स,180 लि.गावठी दारू व 01 नंबरप्लेट नसलेली स्विफट डिझायरकार असा एकूण 682976/- रू किंमतीचा मुददेमाल जप्त केला. ही कारवाई 29/06/2021 रोजी सायंकाळी 7च्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी नितेश दिनेश आरेकर वय 32 वर्षे रा.नरवण ता.गुहागर जि.रत्नागिरी
याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश दिनेश आरेकर याने गोवा बनावट मदयाचे काही बॉक्सघराचे बाजूस गोठयात तर गावठी दारू व काही बॉक्स स्विफट डिझायर कार मध्ये ठेवले होते
यानंतर बो-या ता.गुहागर जि.रत्नागिरी येथे कारवाई करून गोल्डन एस व्हीस्कीचे 2बॉक्स सह मॅक्डॉल नं 01 व्हिस्की,हायवर्डस व्हिस्की, डिएसपी ब्लॅक असा एकूण 64584/- रू.किमतीचामुददेमाल जप्त केला. याप्रकरणी सुप्रिया संदेश ठाकूर वय 42 वर्षे रा.र्कोड कारूळ बो-या ता.गुहागरजि.रत्नागिरी हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई निरीक्षक शरद जाधव, दुययम निरीक्षक सत्यवान भगत,किरण पाटील,
स.दु.नि विजय हातीसकर, जवान सागर पवार,दत्तप्रसाद कालेलकर, विशाल विचारे, महिला जवान अनिता
नागरगोजे यांनी केली. पुढील तपास निरीक्षक शरद जाधव व दुययम निरीक्षक सत्यवान भगत करीत आहेत.”याचपध्दतीने गोवा बनावट व गावठी दारूधंदयावर कारवाया सुरू राहतील असाइशारा प्र.अधिक्षक वैभव.व्ही.वैदय यांनी दिला आहे.”
www.konkantoday.com