
जनसेवेसाठी शिवसेना सदैव तत्पर! जनता दरबार
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, बाळासाहेब भवन येथे ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला होता. जनतेच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असूनशेकडो नागरिकांनी या दरबारात आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या, ज्यातील काही समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यात यश आले.

नागरिकांना दिलासा मिळाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी विविध विभागांशी संबंधित अडचणी घेऊन नागरिक उपस्थित होते. या समस्या शासन स्तरावर तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या असल्याचे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगत जनतेच्या सेवेसाठी शिवसेना सदैव तत्पर आहे, असे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.