खासगी सावकारांकडून पिळवणूक होत असेल तर निबंधक कार्यालयाकडे संपर्क करा
चिपळूण येथील खाजगी सावकराकडुन पिळवणूक प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता संबंधित यंत्रणाही सतर्क झाली आहे. सावकाराकडून कर्ज घेतलेल्यांची जर पिळवणूक होत असेल, तर थेट सहायक निबंधक कार्यालयाकडे संपर्क साधा, असे आवाहन येथील सहायक निबंधक रोहिदास बांगर यांनी चिपळूणवासीयांना केले आहे, तसेच यापुढे सावकारी करणाऱ्यांची तपासणी मोहीम सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे चिपळुणात सावकारी करणाऱ्यांभोवतीचा फास अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातही असे प्रकार होत असेल तर निबंधक कार्यालयाकडे नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
www.konkantoday.com