
कोराेनाच्या चाचण्या झाल्यानंतर अहवाल येण्यास उशीर होत असल्याने ग्राम कृती दलावरील जबाबदारी वाढली
रत्नागिरी जिल्ह्यातील गावात होणाऱ्या कोरोना चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्यांची नावे ग्राम कृती दल किंवा वाडी कृती दलाच्या प्रमुखांनाच कळविली जात नसल्याने गावांमध्ये या रुग्णांना विलगीकरणात किंवा रुग्णालयात दाखल करण्यास विलंब होत आहे. तसेच अहवाल उशिरा येत असल्याने या गावांमध्ये अशा व्यक्तींपासून संसर्ग वाढण्याचे प्रमाण वाढले आहे.
आरोग्य विभागाकडून चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता बाधित समोर येऊ लागले आहेत. परंतु चाचण्या झाल्या तरी त्यांचे अहवाल उशिरा येत असल्याने या कालावधीत चाचणी केलेली व्यक्ती बाधित असेल तरीही तिचा अहवाल येण्यासाठी अनेक दिवस लागत असल्याने या कालावधीत ही व्यक्ती अनेक व्यक्तींच्या संपर्कात येत असल्याने संसर्ग वाढू लागला आहे.
www.konkantoday.com