आरोग्य योजना कोरोना रुग्णांना वरदान, जिल्ह्यात असणार्‍या खालील रुग्णालयात सुविधा उपलब्ध

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हयात व शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कोरोना रुग्णांना वरदान ठरत आहे.

सदर उपचारासाठी लागणार खर्च सर्व सामान्यांना मदत म्हणून आहे. जिल्हयामध्ये एकूण १६ रुग्णालये या योजनेअंतर्गत समाविष्ठ आहेत. त्यामध्ये कोविड उपचाराचा लाभ घेणेसाठी जिल्हयातील शासकिय व खाजगी रुग्णालये खालील प्रमाणे

शासकिय रुग्णालये – जिल्हा शासकिय रुग्णालय, रत्नागिरी, उपजिल्हा रुग्णालय – कामथे, दापोली

व कळंबणी, तसेच, ग्रामीण रुग्णालय – पाली, मंडणगड, गुहागर, संगमेश्वर

खाजगी रुग्णालये – लाईफ केअर हॉस्पीटल, चिपळूण

बी.के.एल. वालावलकर, डेरवन, चिपळूण.

परकार हॉस्पीटल, रत्नागिरी.

या योजनेचा लाभ घेणेसाठी रुग्णालयात जाताना रुग्णांनी केशरी, पिवळे आणि शुभ शिधापत्रिका किंवा तहसिलदारांचा दाखला, शासकिय ओळखपत्र घेऊन जाणे आवश्यक आहे. सदर उपचारामध्ये रुग्णालयीन उपचाराकरीता शरीरातील ऑक्सीजनची पातळी ९४ टक्केच्या खाली असणारा रुग्ण किंवा व्हेंटीलेटरवर असणारे रुग्ण पात्र राहतील. सौम्य लक्षणे असणारी रुग्ण सदर योजनेत पात्र राहणार नाहीत. अधिक माहितीकरीता सदर रुग्णालयातील वैद्यकिय समन्वयक व आरोग्यमित्र यांचेशी संपर्क साधावा.

कोविड १९ रुग्णांनी उपचार घेण्यासाठी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा शासकिय रुग्णालय, रत्नागिरी यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button