आज तिला अशा देवदूतांमुळे आपली घरची माणसे परत मिळाली
आज आपण विविध ठिकाणी अनेक मनोरुग्ण फिरत असताना बघत असतो दुसर्या कुठच्या तरी प्रदेशातली ही मंडळी कुठेतरी भरकटत येऊन वेगवेगळ्या शहरात पोहोचतात त्याना धड आपले नाव आठवत नसते की आपली घरची माणसं आपले गाव अशा लोकांसाठी रत्नागिरीतील राज प्रतिष्ठानचे सचिन शिंदे व त्यांचे सहकारी कार्यकर्ते मोठे कार्य करीत आहेत त्यामुळे कुठे तरी सार्वजनिक ठिकाणी भटकत असलेल्या या मनोरुग्णांना एक आधार मिळाला आहे राज प्रतिष्ठानसारखी मंडळी एखाद्या ठिकाणी मनोरुग्ण आढळला की त्यांची शारीरिक स्वच्छता करण्यापासून त्यांना कायदेशीर प्रक्रिया करून मनोरुग्णालयात दाखल करण्यापर्यंत सर्व कामे आपुलकीने करीत असतात त्यामुळे आज त्यातील काही मनोरुग्ण बरे होऊन त्यांना आपले कुटूंब मिळाले आहे
काही महिन्यापूर्वी जानेवारी २०२१ मध्ये रत्नागिरीतील दापोली तालुका इथे अनेक दिवसांपासून मानसिक मनोरुग्ण एकाकी फिरत होते. एकूण ६ महिला व ४ पुरुष असे एकूण १० मानसिक रुग्णांना एकत्र करून. राजरत्न प्रतिष्ठानच्या चे अध्यक्ष श्री.सचिन शिंदे व त्यांनच्या टिम ने २ रुग्णवाहिकांद्वारे रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यापैकी पटना येथील एक महिला मानसिक रुग्ण पूर्ण बरी झाली तिला नुकतेच तिचे नातेवाईकांच्या रीतसर ताब्यात देण्यात आले.या साठी मोठी जबाबदारी बजावली डाॅ. शिवदे,डॉ.लवेकर व डॉ.कलबुर्गी व मनोरुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी तिला मनोरुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू केले ६ महिन्यांनी आज ती नीट झाली अगदी पहिली होती तशी .. आज ती मनोरुग्णालयातुन बाहेर पडली . तीचे घर व तिची ओळख डॉ नितीन मोहन शिवदे यांनी शोधलं.नातेवाईकांना भेटून दिलं. आता ती नीट होऊन परत आपल्या नव्या आयुष्यात परतत आहे.. या सर्वात मोठी जबाबदारी बजावली श्री.सचिन शिंदे,रुपेश सावंत अनिरुद्ध खामकर,हेमंत चव्हाण, अमोल शिंदे,तन्मय सावंत,मयुरेश मडके,सौ.राही सावंत सौ.जया डावर व इतर सदस्यानी त्यामुळे आज राज प्रतिष्ठान संस्थेचे कार्यकर्ते अशा मनोरुग्णांसाठी देवदूत ठरत आहेत
www.konkantoday.com