
संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळेत रेल्वेच्या धडकेत लांजातील वृद्धाचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे येथे रेल्वे बोगद्यात लांजा येथील वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली. सीमाराम भिवा दरडे (७०, रा. आडवली चौक) असे मृत वृद्धाचे नाव आहे. देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सीताराम दरडे हे वाडीची वाट चुकून घाटीवळे रेल्वे ट्रॅकवरून गुरूवारी दुपारी ३ वाजता चालत जात होते. यावेळी रत्नागिरी बाजूकडून येणार्या मंगला एक्सप्रेसने घाटीवळे बोगद्यात दरडे यांना धडक दिली. धडकेत दरडे यांचा मृत्यू झाला. याची माहिती देवरूख पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी जावून पाहणी व पंचनामा केला. यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत मसूरकर, सचिन कामेरकर, एस. एस. पंदेरे, संजय कारंडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल रेणुका कांबळे उपस्थित होत्या. दरडे यांनी गावच्या नावाचे टिशर्ट परिधान केले होते. यावरून त्यांची ओळख पटली. देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दरडे यांच्या शवाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.www.konkantoday.com