प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांना खंडणीसाठी धमकी
घोडावत उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत आणि भागीदार नीलेश भरत बागी (रा. बेळगाव) यांच्यासह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन पाच कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न उघड झाला.
कोल्हापूर पोलिसांनी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात छापा टाकून नवी दिल्ली येथील एकाला बेड्या ठोकल्या. रमेशकुमार प्रजापती ठक्कर (वय 54, रा. गणेश प्रसाद सोसायटी सिलेटर रोड, मुंबई) असे त्याचे नाव आहे. मुख्य सूत्रधार व्ही. पी. सिंग (दिल्ली) याच्या शोधासाठी नवी दिल्ली येथील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांशी संपर्क साधण्यात आला आहे.
www.konkantoday.com