निखिल शिंदे यांची रत्नागिरी विधानसभा मतदार संघ युवक निरीक्षक पदी नेमणूक

रत्नागिरी -:राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल शिंदे यांची रत्नागिरी विधानसभा मतदार संघ युवक निरीक्षक पदी नेमणूक झाल्यावर त्यांचा पहीला दौरा दि. २६/०६/२०२१ रोजी झाला. रत्नागिरी तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सिध्देश शिवलकर यांनी निरिक्षक निखिल शिंदे यांचे असंख्य कार्यकर्त्याच्या साथीने जंगी स्वागत केले. रत्नागिरी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सिध्देश शिवलकर यांच्याबरोबर तालुका कार्यकारणीचे प्रमुख पदाधीकारी, जिल्हा परीषद गट अध्यक्ष तसेच पंचायत समिती गण अध्यक्ष यावेळी उपस्थीत होते. रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे प्रमुख नेत्यांनी युवक निरीक्षक निखिल शिंदे यांचे स्वागत केले आणि रत्नागिरी तालुका युवक संघटनेबाबत चर्चा करुन युवक तालुका अध्यक्ष सिध्देश शिवलकर यांचे सुरु असलेले पक्षहिताचे संघटनात्म कामाचे स्वरुप त्यांच्या समोर मांडले. तालुका युवक अध्यक्ष सिध्देश शिवलकर कोवीडमध्ये करत असलेल्या कामाचे कौतुकही केले आणि तसे पत्र युवक निरीक्षक यांच्याकडे दिले त्यावेळी प्रांतिक सदस्य मा. श्री. बशीरभाई मुर्तुझा, पक्षप्रतोद मा. सुदेश मयेकर, अप्लसंख्यांक जिल्हाध्यक्ष मा. जुबेरभाई काझी, तालुका अध्यक्ष मा. राजनदादा सुर्वे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सनी आरेकर, शहर कार्याध्यक्ष मा. अभिजीत उर्फ मनुशेठ गुरव, शहर सरचिटणीस लिलाधर शेठ नागवेकर, महीला तालुका अध्यक्ष सौ. शमिम नाईक, महीला विधानसभा क्षेत्राध्यक्ष सौ. नसिमाभाभी डोंगरकर, महीला शहर अध्यक्ष सौ. नेहालीताई नागवेकर, अप्लसंख्याक तालुका अध्यक्ष मा. मेहबुबभाई मोगल, अल्पसंख्याक शहर महिला अध्यक्ष सौ. सायमाजी काझी, सामाजीक न्याय विकास शहर अध्यक्ष संतोषजी चव्हाण, पावस विभाग अध्यक्ष सज्जनजी लाड, युवा शहराचे नेते नौसीन काझी आदी उपस्थीत होते. रत्नागिरी विधानसभा मतदार संघ युवक निरिक्षक निखिलजी शिंदे यांनी सर्व प्रमुख युवक पदाधीकारी यांच्याबरोबर पक्ष संघटना वाढीबाबत चर्चा केली आणि त्यामुळे युवक संघटना वाढीसाठी संजिवनी मिळाली असल्याचे तालुका अध्यक्ष सिध्देश शिवलकर यांनी सांगितले. रत्नागिरी तालुक्याचे युवक प्रमुख पदाधीकारी यांची उपस्थीती पाहुन निरीक्षक निखीलजी शिंदे यांनी युवक तालुका अध्यक्ष सिध्देश शिवलकर यांचे कौतुक केले. रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचा हा माझा प्राथमीक चर्चा करण्यासाठीचा दौरा असुन लवकरच रत्नागिरीमध्ये बैठक लावण्यात येईल असे निरीक्षक निखीलजी शिंदे यांनी सांगितले. रत्नागिरी हातखंबा येथील सिध्देश कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निरीक्षक निखीलजी शिंदे यांच्या हस्ते प्रवेश करुन घेण्यात आला असल्याचे युवक तालुका अध्यक्ष सिध्देशजी शिवलकर यांनी सांगितले. रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे युवक निरीक्षक निखीलजी शिंदे यांच्या प्राथमीक चर्चासाठीच्या दौ-यावेळी युवक तालुका उपाध्यक्ष सुकेश शिवलकर, निलेश खोराटे, मुज्जफर काझी, प्रितम भाटकर, युवक सरचिटणीस रईस नाकाडे, विरेश पाटिल, सुरज मयेकर, निहाल नागवेकर, युवक सचिव अतुलजी शितप, युवक सदस्य मनिष गुरव, अरविंद पालकर, वैभव नैकर, प्रशांत पवार, अझहर जमादार, नागेश गजबार, आदिल सय्यद, नाचणे युवक गट अध्यक्ष सागर भुरवणे, शिरगाव युवक जि.प गट उपाध्यक्ष आतिक काझी, पावस युवक गण अध्यक्ष संजय नैकर, पावस गट अध्यक्ष विकी पंगेरकर, हातखंबा युवक गट अध्यक्ष सिध्देश कदम, युवक गोळप गण अध्यक्ष दयानंद फटकरे, मालगुंड युवक गण अध्यक्ष राजन दुर्गवली, हरचेरी युवक गण अध्यक्ष पंकज पवार, शिरगाव युवक गण अध्यक्ष सुहेल काझी, कर्ला गण अध्यक्ष नफीस डोंगरकर, कुवारबाव गण अध्यक्ष ओंकार कांबळे हे युवक प्रमुख पदाधीकारी उपस्थीत होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button