
धरण उशाला आणि कोरड घशाला म्हणण्याची धरणक्षेत्रातील शेतकऱ्यांवर वेळ
गेले काही दिवस धरणक्षेत्रात झालेल्या समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यातील शिरवली, कोडिवली आणि पिंपळवाडी ही धरणे १०० टके तर नातुवाडी धरण ३७ टके भरले आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने यंदा पाणी टंचाईची झळ कमी बसण्याची शक्यता आहे.
खेड तालुक्यात नातूवाडी, शिरवल, पिंपळवाडी, कोंडीवली, शेलारवाडी,तळवट या सहा धरणांमध्ये पाणीसाठा करण्यास सुरवात झाली आहे. तर पोयनार, न्यु मांडवे, ही धरणांची अजून अपुर्ण अवस्थेत आहेत. नातुवाडी, शिरवली या दोन धरणांच्या कालव्यांची कामेही पूर्ण झाली असल्याने या धरणातील पाणी सिंचनासाठी वापरले जाते. मात्र अन्य धरणांच्या कालव्यांची कामे अद्याप
पुर्ण झाली नसल्याने धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असूनही धरणातील पाणी सिंचनासाठी वापरले जात नाही. मुंबई गोवा महामार्गालगतच्या डोंगरात उगम पावणाऱ्या चोरटी नदीवर बांधण्यात आलेले नातूवाडी धरण हे शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक उपयुक्त असलेले धरण आहे. या धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर परिसरातील शेकडो शेतकरी दुबार पिकं घेतात. या धरणाच्या पाण्यामुळे परिसरातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायमस्वरुपी निकाली निघाला आहे. नातुवाडी प्रमाणेच शिरवली धराच्या पाण्यावर परिसरातील शेतकरी दुबार पिकं
घेतात. धरणामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचा चांगलाच आर्थिक उत्कर्ष झालेला आहे. मात्र पिळवाडी, कोंडिबली, शेलारवाडी, तळवट या धरणांमध्ये मुबलक पाणी साठा असूनही केवळ कालव्यांची कामे रखडल्याने पाण्याचा सिंचनासाठी काहीही उपयोग होत नाही.
नातुवाडी आणि शिरवली ही दोन धरणं तालुक्यातील काही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी आहेत. धरणात असलेल्या मुबलक पाण्यावर परिसरातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली तर निघालाच परंतू धरणाच्या पाण्यावर दुबार शेती करण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्याने त्यांचा आर्थिक उत्कर्ष देखील झाला. या दोन धरणांप्रमाणेच तालुक्यातील अन्य धरणांतील पाण्याचा वापर सिंचनासाठी होणे आवश्यक आहे. मात्र कालव्यांची कामे अपूर्ण असल्याने धरणक्षेत्रात
समाधानकारक पाऊस होवूनही त्या पाण्याचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग होत नसल्याने परिसरात धरण असूनही शेतकऱ्यांना आर्थिक उत्कर्ष साधता आलेला नाही.
परिणामी धरण उशालाआणि कोरड घशाला असे म्हणायची वेळ धरण परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे
www.konkantoday.com