जगबुडी नदीवरील पुल जोडरस्त्यामुळे अजुनही अर्धवट
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनाका जवळील जगबुडी नदीवरील पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे ठेकेदाराने केलेले विधान हवेतच विरले. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्याने काम अर्धवट अवस्थेत आहे. या पुलाचे काम लवकरात लवकर कराहे अशी मागणी होत आहे. जगबुडी नदीवरील ब्रिटीशकालीन पुल कालबाह्य झाला होता. तो कधी कोसळलेल याचा नेम नव्हता. नेमका याच पुलावरून महाकाली खाजगी बस कोसळून ३७ प्रवाशांचा बळी गेला होता. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी मंजूर करून घेतलेल्या पुलाचे बांधकाम पूर्वीच्या ठेकेदाराने अधर्वट सोडले होते. परंतु त्यानंतर या पुलाचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असल्याने अर्धवट अवस्थेत पुलाचे बांधकाम करण्याची जबाबदारी कल्याण टोल कंपनीकडे आल्याने रखडलेल्या पुलाच्या बांधकामाला सुरूवात झालेली आहे. पुलाचे बांधकाम झाले आहे. मात्र जोड रस्त्याच्या कामाला सुरूवात न झाल्याने पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे.
www.konkantoday.com