अभिनयाचा उत्तम दर्जा दाखविणारा एक उत्तम चित्रपट पुनःश्य हरी ओम आपल्या भेटीला, रत्नागिरीतील दोन कलाकारांची अभूतपूर्व कामगिरी

सर्व ठिकाणी वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव आणि अत्यंत कठीण काळ यामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. परंतु अशा प्रसंगात जेव्हा जवळचे साथ देत नाहीत तेव्हा आपले कलाकार मित्र याच कठीण काळात कष्ट करून आपल्याला आनंदी ठेवण्याचा आणि आपल्या चेहर्‍यावर छोटसं हसू आणण्याचा प्रयत्न करत असतात. कोकण हे अशाच विविध कलाकारांनी सजलेले एक सुंदर विश्‍व आहे. कोकणातील रत्नागिरीतील दोन कलाकार निखिल पाडावे आणि प्रथमेश भाटकर यांनी असेच कष्ट करून निखिल पाडावे यांनी त्यांच्या एडिटींगचा तसेच प्रथमेश भाटकर यांनी त्यांच्या अभिनयाचा उत्तम दर्जा दाखविणारा एक उत्तम चित्रपट पुनःश्य हरी ओम आपल्या भेटीला आला आहे. फ्रेमएलमेंटस मिडिया ऍण्ड एंटरटेनमेंट आणि झी टॉकीज प्रस्तुत पुनःश्‍चय हरी ओम हा चित्रपट ११ जुलै २०२१ रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वा. झी टॉकीजवरती प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात स्पृहा जोशी, विठ्ठल काळे, निता शेंडे, वंदना वाकनिस- सरदेसाई, संजय कुलकर्णी, प्रथमेश भाटकर, देवेंद्र गायकवाड हे अतिशय मेहनती आणि दिग्गज कलाकार आहेत.
रोहित म्हात्रे सचिन यादव, बवेश जानवलकर निर्मित मिताली जोशी लिखित, विविध कोरगावकर दिग्दर्शित, गायक-अनुराग गोडबोले, शब्द-मनिष अनसुरकर, संगीत-अनुराग, चिन्मय असा हा चित्रपट अतिशय काळजीपूर्वक आणि मेहनतीने एक आगळी वेगळी कलाकृती म्हणून आपल्या भेटीला आणला आहे. तसेच या चित्रपटातील गाणेही युट्युब वरती प्रदर्शित झाले आहे. निखिल पाडावे, प्रथमेश भाटकर यांच्या कलाकृतीमुळे आणि त्यांच्या कष्टामुळे रत्नागिरीकरांना त्यांचा विशेष अभिमान आहे. हे दोन्ही कलाकार रत्नागिरीचे असून अतिशय मेहनती आणि अभ्यासू आहेत आणि त्यांच्या याच मेहनतीचे चीज होताना आपण पाहतो आहोत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button