लायन्स क्लब रत्नागिरी कडून गरज ओळखून अद्ययावत वातानुकूलित शवपेटी (डेड बॉडी फ्रिजर) रत्नागिरी तालुक्यासाठी प्रदान

लायन्स क्लब रत्नागिरीने गरज ओळखून अद्ययावत वातानुकूलित शवपेटी (डेड बॉडी फ्रिजर) अर्पण केली आहे. रत्नागिरीत क्लब सामाजिक जबाबदारीने अनेक कार्यात पुढाकार घेतला आहे.
लायन्स क्लब रत्नागिरीच्या अध्यक्षा श्रेया केळकर, सचिव मनाली राणे आणि खजिनदार डॉ. शिवानी पानवलकर यांच्या नेतृत्वाखाली डेड बॉडी फ्रिजर देण्यात आला.
या उपक्रमासाठी लायन्स क्लबचे प्रमोद खेडेकर, डॉक्टर सचिन पानवलकर, ॲड. राजेंद्र भुर्के, सुनील देसाई यांचे प्रमुख आर्थिक सहकार्य लाभले आहे.
शवपेटीच्या उपलब्धतेसाठी खजिनदार डॉ. शिवानी पानवलकर यांचे सर्वाधिक योगदान आहे. कोईंबतूर येथून ही शवपेटी बनवून घेतली.
लायन्स क्लब रत्नागिरी गेले वर्षभर रत्नागिरी शहर आणि परिसरामध्ये विविध सामाजिक कार्यक्रम राबवत आहे. लायन्स क्लब रत्नागिरी कोविडच्या सारख्या कठीण परिस्थितीमध्येही आपल्या सामाजिक कार्याचे महत्वपूर्ण कार्य पार पडत आहे.
लायन्स क्लब रत्नागिरीने गेल्या वर्षभरात केलेल्या सर्व सामाजिक कार्याची लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेने सुद्धा दखल घेतली आहे.
या शवपेटीचे व्यवस्थापन रत्नागिरीतील समीर करमरकर व त्यांच्या सहकाऱ्यांची असलेली अपरांत संस्था यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. त्यासाठी खालील सदस्यांना संपर्क साधावा ही विनंती.
१) अनिरुध्द लिमये, कार्यवाह, राष्ट्रीय सेवा समिती, मोबाईल
9422433717
२) समीर करमरकर, नगर सेवा प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अपरांत संचलित जय परशुराम रुग्णोपयोगी साहित्य सेवा कार्यकर्ता, मोबाईल-9422430805
३) विनायक शितुत, अपरांत संचलित जय परशुराम रुग्णोपयोगी साहित्य सेवा प्रमुख, 9665736914
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button