
रत्नागिरीत अंमली पदार्थ ब्राऊन शुगर जप्त
ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान रविवारी रत्नागिरी पोलिसांनी टीआरपीजवळ एकाकडून ३ किलो ३४ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले. हा अंमली पदार्थ ब्राऊन शुगर या प्रकारातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अंमली पदार्थाची किंमत ३१ हजार ८५० आहे. हा अंमली पदार्थ कोड वर्डमध्ये ‘टर्की’ या नावाने विकला जातो.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस गस्त घालत असताना टीआरपी येथे रेल्वेपुलाजवळ फैजान निसार हाजू याच्याकडून प्लास्टिकच्या पिशवीतील ३ किलो ३४ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ जप्त केला. त्याच्याकडून एकूण ४१ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण,पोलीस हेड कॉन्स्टेबल शांताराम झोरे, सुभाष भागणे, नितीन डोमणे, मिलिंद कदम, प्रशांत बोरकर, अरूण चाळके, बाळू पालकर, संजय जाधव, विजय आंबेकर, अमोल भोसले, सागर साळवी, अक्षय कांबळे यांनी केली.
www.konkantoday.com