
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा तळाला
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावांत मिळून सध्या के वळ १६ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिक असला तरी धरणक्षेत्रात अद्याप पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी अतिशय धीम्या गतीने वाढते आहे.
उध्र्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३८०० दशलक्षलिटर पाणीपुरवठा होत असतो. या सातही धरणांत मिळून रविवापर्यंत के वळ २ लाख ४१ हजार ९७ दशलक्ष लिटर पाणीसाठा म्हणजे धरणाच्या साठवण क्षमतेच्या के वळ १६.६६ टक्के पाणीसाठा आहे. मुंबईला संपूर्ण वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असावे लागतात.
www.konkantoday.com