
जिल्हा परिषद भवनावरील सौरउर्जा पॅनेलला अखेरची घरघर
रत्नागिरी जिल्हा परिषद भवनावरील सौरउर्जा पॅनेलला अखेरची घरघर लागली असून खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. ठेकेदार, अधिकारी यांच्या संगनमताने सौरउर्जा पॅनेल बसविण्यामागील मुख्य उद्देश सफल झालेला नाही.
परिषद भवनात अहोरात्र सुरू असलेेले एसी, पंखे, बल्ब, ट्युबलाईटमुळे दरमहा लाखो रुपयांचे वीज बिल येत आहे. वीज बिलात बचत करण्यासह परिषद भवनात अहोरात्र लखलखाट राहावा यासाठी सौरउर्जेचा पर्याय स्विकारण्यात आला होता. निविदा प्रक्रियेद्वारे ठेकेदार निश्चित करून त्याच्यावर सौरउर्जा पॅनेल बसविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार ठेकेदाराने परिषद भवनाच्या टेरेसवर सौरउर्जा पॅनेल बसविले असून ते अद्यापही कार्यान्वित झालेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
नव्याने बसविलेल्या सौरउर्जा पॅनेलमध्ये अल्पावधीतच तांत्रिक बिघाड होण्यामागील मुख्य कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. संबंधित विभागाने ठेकेदाराशी संपर्क न साधल्याने सौरउर्जेचा प्रयोग यशस्वी झालेला नाही.
www.konkantoday.com