
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी संजय गांधी उद्यानाचे बचाव पथक रत्नागिरीत दाखल
रत्नागिरीतालुक्यातील मेर्वी-जांभूळआड येथे गुरे चरण्यासाठी नेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. या हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. त्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यासाठी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उदयान येथील बचाव पथक काल रत्नागिरीत दाखल झाले आहे. अनेक ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्याने आपल्या बछड्याच्या सुरक्षिततेसाठी बचावात्मक दृष्टीने हा हल्ला केला, असावा अशी शक्यता वन विभागाने वर्तविली आहे. मेर्वी जांभूळआड येथील जनार्दन काशिनाथ चंदुरकर यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला होता त्यात ते जखमी झाले होते
www.konkantoday.com