
कोकण प्रदेशावर अन्याय करणाऱ्या विषयांवर एकत्र यावे लागेल आणि रस्त्यावर उतरून आंदोलन उभी करावी लागतील, कोकणवासीयांचा इशारा !
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे, मुंबई सातारा कोल्हापूर हायवे, मुंबई नाशिक हायवे, अहमदनगर हायवे, सोलापूर हायवे
महाराष्ट्रातले जवळपास सर्व प्रमुख हायवे हे मागील पंधरा वीस वर्षात बांधून पूर्ण झाले. आणि त्यामुळेच त्या त्या भागांचा आणि त्या त्या शहरांचा प्रचंड वेगाने विकास सुरू झाला. आज पुणे आणि पिंपरी शहर हे मुंबईची स्पर्धा करते आहे. महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वकांक्षी प्रकल्प समृद्धी हायवे मुंबई पासून नागपूर पर्यंत हा अतिशय अत्याधुनिक महामार्ग अस्तित्वात नसलेला. पूर्णतः नवीन जागा विकत घेऊन जवळपास चार वर्षात पूर्ण होण्याच्यां स्थितीत आहे हे
महाराष्ट्र राज्यासाठी अभिमानास्पद आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भविकासाला गती देण्याचे काम आणि या प्रदेशाला जगाशी जोडण्याचा काम हा महामार्ग करेल. रक्तवाहिन्या जे शरीरात काम करतात , आणि सुदृढ शरीर बनवतात हेच काम देशासाठी आणि राज्यासाठी महामार्ग करतात. ज्या देशाचे किंवा राज्याचे रस्ते चांगले तो देश प्रचंड वेगाने प्रगती करतो आणि हे अमेरिकेचे उदाहरण देऊन पाहता येतात. दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण अमेरिकेमध्ये उभे-आडवे रस्त्याचे अत्याधुनिक जाळे निर्माण करण्यात आले
आणि त्यानंतर प्रचंड वेगाने अमेरिकेचा विकास झाला आज ती जागतिक महासत्ता आहे. महाराष्ट्राच्या एकूण विकासाच्या प्रक्रियेत सर्वात जास्त विकासाची क्षमता असलेला आणि निसर्ग समृद्ध कोकण प्रदेश कायमच दुर्लक्षित आहे. महाराष्ट्रातले सर्व रस्ते पूर्ण झाल्यानंतर सर्वात शेवटी कोकणातील चौपदरी रस्त्याचे काम सुरू केले. सुप्रीम नावाचा पहिलाच कॉन्ट्रॅक्टर हा अतिशय बोगस कॉन्ट्रॅक्टर या रस्त्यासाठी निवडण्यात आला. हा कॉल ट्रॅक्टर दिवाळखोर झाला. त्यांनी पनवेल ते इंदापूर ऐंशी किलोमीटर चा रस्ता बनवला तर नाहीच पण तो अडवून ठेवला. आज अकरा वर्षे पूर्ण झाली कोकणात येण्याचं प्रवेशद्वार पनवेल ते इंदापूर हायवे हा अतिशय वाईट स्थितीमध्ये आजही आहे. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्याची पायवाट होते आणि ती यावर्षी सुद्धा झाली आहे. या हायवे ला अडीचशे कोटी रुपयांचा निधी पूर्ण होण्यासाठी आवश्यक आहे. दिवाळखोर कॉन्ट्रॅक्टरला बँक पैसे देत नाही आणि त्यामुळे गेली दोन वर्ष या रस्त्यावर फारसे काम होतच नाही. तर सरकारने हा निधी उपलब्ध करून द्यावा पण आमच्या स्वर्गभूमी ला भेटीला धरण्याचे बंद करावे.
त्यापुढील चारशे किलोमीटरचा हायवे दहा ठेकेदारांना विभागून देण्यात आला. नॅशनल हायवे अथोरिटी हा रस्ता बनवत आहे व राज्याचा पीडब्ल्यूडी विभाग याचे दर्जाचे नियंत्रण सुपर विजन करत आहे. सुदैवाने यातील काही ठेकेदार यांनी गतीने काम केले. राजापूर आणि कणकवली कुडाळ सावंतवाडी या परिसरातील चार ठेकेदाराने अपेक्षित दर्जाचे काम केले नसले
तरी समाधानाची गोष्ट आहे त्यांनी ठरल्या वेळेत हे काम जवळपास पूर्ण केले. त्यामुळे चारशे 400 किलोमीटर मधील
दोनशे किलोमीटर रस्ता जवळपास पूर्ण झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिशय समाधान देणारा आणि गतीने प्रवास करण्याची सुविधा देणारा या जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि विकासाला गती आणि चालना देणारा महामार्ग पूर्ण झाला आहे . याबद्दल आम्ही संबंधित नेते आणि यंत्रणा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि त्यांचे अभिनंदन करतो. मात्र उरलेल्या दोनशे किलोमीटर रस्त्याची अवस्था भयानक आहे. टोलचे मोठे-मोठे कॉन्ट्रॅक्ट घेणारी mep नावाची कंपनी या बोगस कॉन्ट्रॅक्टरने आरवली संगमेश्वर आणि त्यापुढे रत्नागिरी लांजा वाकेड पर्यंत दोन सेगमेंट चे
जवळपास 80 किलोमीटर हायवे काम सुरूच केले नाही.
आत्ता त्याच्या जाग्यावर दुसरा कॉन्ट्रॅक्टर म्हात्रे कंपनीचा आला आहे व त्यांनी हे काम सुरू केले आहे ही समाधानाची बाब आहे. मात्र कितीही वेगाने हे काम केले तरी पुढची दोन अडीच वर्ष हे काम पूर्ण व्हायला लागेल. म्हणजेच कोकण हायवे खऱ्या अर्थाने पूर्ण होण्यासाठी अजून दोन ते तीन वर्षे लागतील असे दिसते. या हायवेवर जे कॉन्ट्रॅक्टर काम करत आहेत ते अतिशय बेजबाबदार इथे वागत आहे. ज्यांनी कामे पूर्ण केली त्या कामाच्या दर्जाबाबत अनेक गंभीर समस्या आहेत. अरुंद सर्विस रोड, त्या-त्या जंक्शन वरती पुरेशी सुरक्षा व्यवस्था, हायवेवरून त्या-त्या गावांकडे जाण्याच्या आऊटलेट आणि हायवे वरचे बोर्ड या सर्व विषयात पुरेसे लक्ष दिलेले नाही.
यामुळे या परिसरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
ज्या २५० किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे येथील कॉन्ट्रॅक्टर मनमानी पद्धतीने काम करत आहेत. कोकणात माणसे राहतात आणि आम्ही या देशाचे नागरिक आहोत
आम्हाला किमान गाडी चालवता येईल असा रस्ता मिळणे आवश्यक आहे . पण दर पावसाळ्यात या हायवे वर अनेक ठिकाणी हायवेची पायवाट होते 2/3/4 फुटाचे खड्डे पडतात.
आणि संपुर्ण कोकण प्रदेशाला वेठीला धरले जाते. या पायवाटांवरून गाडी चालवणे आणि विशेषता टू व्हिलर मोटर सायकल चालवणे हे अग्निदिव्य आहे. दोन वर्ष कोरोनामुळे पर्यटन उद्योग उध्वस्त झाला आहे. असे रस्ते असतील तर कोकणात पर्यटक येणारच नाही अशी स्थिती आहे. आणि ही स्थिती गेली अकरा वर्षे आम्ही अनुभवत आहोत.
हायवे संदर्भात गेली अकरा वर्ष जे काय सुरू आहे ते कोकण प्रदेशावर प्रचंड अन्याय करणारे आहे. यामुळे संपूर्ण प्रदेशाचा विकास वेठीला धरला आहे जवळपास थांबला आहे. अन्याय सहन करण्याची कोकणी माणसाची क्षमता प्रचंड आहे त्याबद्दल मी स्वतंत्र लेख लिहिन. पण मित्रांनो फक्त गणपतीला आणि शिमग्याला शिव्या घालून हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी उदासीनता बाजूला ठेवून रस्त्यावर उतरावे लागेल. सातत्याने पाठपुरावा करावा लागेल. हा रस्ता दर्जेदार होईल यासाठी आग्रही भूमिका घ्यावी लागेल. सर्व संबंधित यंत्रणांवर ती दबाव बनवणे आवश्यक आहे. हे असं का घडतंय याचा जाब विचारावा लागेल. भावनिक प्रश्नांवर सहजपणे एकत्र येणाऱ्या कोकणवासियांनी विकासाच्या प्रश्नांवर ती एकत्र यावा लागण रस्त्यावर उतरावे लागेल. गावागावात आणि घराघरात राजकारण पोहोचल्यामुळे
अनेकांना हा लेख वाचून आपल्या नेत्यांवर किंवा आपल्या पक्षावर टीका केली जाते असं वाटू शकेल. मित्रांनो कोणत्याही पक्षावर किंवा नेत्यावर टीका आपल्याला अभिप्रेत नाही. राजकारणावर अवलंबून न राहता एक बिगरराजकीय किंवा सर्वपक्षीय व्यासपीठ कोकण हायवे समन्वय समितीच्या
माध्यमातून आम्ही उभारत आहोत. कोकण हायवे या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचे काम हे व्यासपीठ करील. याकरता सातत्याने एक अभियान आणि आंदोलन आम्ही सुरू करीत आहोत. ज्यांना ज्यांना हा प्रश्न महत्त्वाचा वाटतो त्यांनी जात-पात पंथ भेद पक्ष हे विसरून या प्रश्नासाठी एकत्र येणं आवश्यक आहे त्याकरता आम्ही आवाहन करत आहोत. एडवोकेट ओवेस पेचकर. तरुण वकिलाने एकट्याने या प्रश्नावर हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे
या याचिकेचे आम्ही समर्थन करतो. कोणतेही एकत्रित व्यासपीठ किंवा पाठिंबा नसताना त्या त्या परिसरातील कार्यकर्ते या प्रश्नावर त्या त्या भागात संघर्ष करत आहेत
या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे काम हायवे समन्वय समिती करीत. पुढील तीन महिन्यात आणि वर्षभरात टप्प्याटप्प्याने हे आंदोलन आणि हे अभियान पुढे जाईल . याचा निश्चित कार्यक्रम पुढील महिनाभरात आम्ही जाहीर करू. यासंदर्भात या अगोदरच तज्ञांच्या मदतीने आणि या हायवे चा अहवाल बनवला आहे. संबंधित प्रमुख मान्यवरांना हा अहवाल आणि निवेदन आम्ही दिले आहे. मात्र केवळ निवेदन देणे आणि शिष्टमंडळ हे पुरेसे नाही. कोकण प्रदेशावर अन्याय करणाऱ्या विषयांवर एकत्र यावे लागेल आणि रस्त्यावर उतरून आंदोलन उभी करावी लागतील. ही संपूर्ण अभियान कोणा व्यक्तीच्या किंवा कोणा पक्षाच्या विरोधात जात नसल्यामुळे कृपया या विषयात
केवळ राजकीय टीपा टिप्पणी किंवा एकमेकांवर दोषारोप करू नयेत. आपल्यावर आपल्या प्रदेशावर अन्याय होतो कारण आपण उदासीन आहोत हे मान्य करून सक्रिय होऊया. कोणाला दोष देण्यापेक्षा आपण एकत्र येऊन काय करू या मी काय करू शकेल आपापल्या भागात आपण काय करू शकतो यावर चर्चा आणि ॲक्शन प्लॅन निश्चित करूया.
आणि सोशल मीडियावर फक्त चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करणारे सक्रिय कार्यकर्ते एकत्र येऊया. आणि पुढील एक-दोन वर्षात देशातला सगळ्यात सुंदर दर्जेदार आणि निसर्ग समृद्ध हायवे निर्माण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी बरोबर संघर्ष करूया आवश्यक तेथे या यंत्रणांना सहकार्य करूया मदत करूया. आपल्या अडचणी त्यांना सांगताना त्यांच्या अडचणी सुद्धा आपण समजून घेऊया. एक आंदोलन एक अभियान राजकारणाच्या पलीकडे जाऊन सकारात्मक पद्धतीने आपण सर्वांनी सुरू करू. जालना जालना या प्रक्रियेत कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हायचे आहे. त्यांनी आपले दूरध्वनी क्रमांक व्हाट्सअप नंबर द्यावेत. या चळवळीय करता स्वतंत्र व्हाट्सअप ग्रुप बनवण्यात आला आहे. त्यामध्ये आपल्याला सहभागी करून घेतले जाईल.
संजय यादवराव. ग्लोबल कोकण
यशवंत पंडित. +91 98201 90391
अभिजित पेडणेकर. मुंबई. +91 98200 52989
अश्विन परब वसई विरार. +91 97661 02440
उत्तम दळवी कल्याण-डोंबिवली. +91 97690 75036
ऍड. मंगेश नेने. पेण. +91 99750 07600
निलेश म्हात्रे वडखळ. +91 91309 04089
संतोष ठाकूर पनवेल
ऍड विलास नाईक. अलिबाग
संतोष मेहता पोलादपूर
प्रकाश कदम महाड पोलादपूर 99215 44030
प्रसाद पटवर्धन खेड. 77220 10888
विकास शेटे मंडणगड. +91 94036 98799
नरेश पेडणेकर. दापोली+91 98211 41579
सुदेश केमनाईक श्रीवर्धन. +91 98224 02610
अश्फाक देसाई चीपळून. 98603 87588
युयुत्सु आर्ते देवरुख. +91 94223 51926
रमजान गोलंदाज संगमेश्वर. +91 99604 16683
राजू भाटलेकर रत्नागिरी. +91 91303 83666
सुहास ठाकूरदेसाई रत्नागिरी+91 99604 16683
मिथिलेश देसाई लांजा +91 82754 55176
जगदीश ठोसर राजापूर
दीपक परब मालवण 98206 32318
संग्राम प्रभुगावकर सिंधुदुर्ग 94235 11015
सतीश लळीत सिंधुदुर्ग 94224 13800
पंडित रावराणे. वैभववाडी