सुपरवायझरचा मालकाला लाखोंचा गंडा
मच्छीविक्रेत्या मालकाच्या आजाराचा सुपरवायझरने फायदा घेत ७ लाख ३५ हजाराची फसवणूक केल्याची तक्रार रत्नागिरी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.ही फसवणूक ४ मे २०२१ ते २६ मे २०२१या कालावधीत करण्यात आली.
मोहम्मद अली सिराज शेख (रा. साखरतर, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सुपरवायजरचे नाव आहे. त्याच्याविरोधात मालक शाहिद मोहम्मद हुसेन मिरकर (५२,रा.गवळीवाडा, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, ते आजारी असताना शेख याने मोहम्मद मिरकर यांचे येणे असलेल्या प्रशांत विलणकर यांच्याकडील ७ लाख ३५ हजार ४७९ रक्कम घेऊन स्वतः व्हाऊचरवर सही करून आपल्या फायद्यासाठी वापरून त्यांची फसवणूक केली.
www.konkantoday.com