सरकारने बी एस एन एल चे दायित्व स्वीकारावे! दूरसंचार नेते महादेव अडसूळ यांची मागणी

दूरसंचार कर्मचारी अधिकारी यांची देशभर निदर्शने

दूरसंचार कर्मचारी व अधिकारी यांची देशभर निदर्शने करण्यात आले त्याप्रमाणे कालही रत्नागिरीत निदर्शने झाली सरकारने बी एस एन एल चे दायित्व स्वीकारावे अशी मागणी दूरसंचार नेते महादेव अडसूळ यांनी केली आहे
यावेळी बोलताना नंदू कदम,सचिव,BSNL,संचार निगम एक्झक्युटिव्ह असोसिएशनचे नेते नंदू कदम म्हणाले की
सरकारी दूरसंचार विभाग सध्या बी एस एन एल व एम टी एन एल म्हणून ओळखला जातो, खाजगी दूरसंचार कंपन्यांच्या शिरकावाने हा विभाग मोठ्या प्रमाणात आजारी झाला असून , केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने तो अधिक प्रभावी आजारी झाला. या दोन्ही विभागाने नुकतीच भरीव कामगार कपात करून ही दोन्ही उद्योग समूहाची उभारणी पुन्हा मजबूत होईल ही अशा ही फारशी नसल्याचे सध्या तरी चित्र आहे. या मध्ये कामगार संघटन अधिक प्रभावी झाल्याचे दिसून येत आहे.
सध्या बी एस एन एल व एम टी एन एल यांची अवस्था बिकट असून, कमी प्रमाणात असणारे मनुष्य बळ हे मुख्य कारण आहे. क्रीम व मुरब्बी तसेच अनुभवी कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने व्हीआरएस स्कीम मध्ये घरी गेल्याने ,पूरक अश्या मनुष्य बळाची मोठी समस्या प्रशासना समोर उभी आहे.
सुमारे सत्तर हजार म्हणजे ६०टक्के कर्मचारी घरी जाऊन ही या उद्दोगाची आर्थिक स्थिती सुधारत नसल्याने , उर्वरित ४०टक्के कर्मचारी व अधिकारी यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही धोबीपछाड थांबवावी या करिता कर्मचारी अधिकारी पुन्हा एकदा मैदनात उतरले असून आज शुक्रवारी देशभर निदर्शने करण्यात आली.
सर्व संघटना कर्मचारी अधिकारी महासंघ यांनी ही निदर्शने आयोजित केली होती. यात प्रामुख्याने, वेळेत वेतन मिळावे, तिसऱ्या पे रिवजन ची अमलबजावणी तत्काळ करावी, बी एस एन एल मार्केट मध्ये स्पर्धा करील म्हणून फोर जी यंत्रणा तत्काळ बसवावी. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आज राज्यात ह्या महत्त्वपूर्ण मागण्या करिता कोरोना नियम पाळत कर्मचारी व अधिकारी यांनी देश पातळीवर जोरदार निदर्शने केली असून, राज्यात याचे नेतृत्व अधिकारी महासंघाचे नेते महादेवराव अडसूळ यांनी केले. मुंबई येथे प्रतिनिधी बरोबर बोलताना त्यांनी या सर्व मागण्याचे सविस्तर विश्लेषण केले आहे. फोर जी सेवेमुळे बी एस एन एल च्या उत्पादनात भरीव वाढ होणार असून, बी एस एन एल चे दातृत्च सरकारने दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे म्हटले आहे. कामगार व अधिकारी यांचे वेतन , दरमहा निर्धारित वेळेत करावे, सध्या कोरोना महामारी चालू असून सुमारे दोन महिने वेतन मिळत नसल्याने कर्मचारी अधिकारी व बी एस एन एल चे ठेकेदार कर्मचारी यांची मोठी उपासमार होत आहे.सरकारने बी एस एन एल च्य दातृत्वाची राष्ट्रीय समर्ती द्यावी असे ही ते पुढे म्हणाले
राज्यात सर्वदूर निदर्शने शांत पद्धतीने केली. सरकार ने तातडीने या वर तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button