
देवडे गावातील चिंचवलकरवाडीने लग्नातील अनिष्ट आणि खर्चिक प्रथांना थारा न देण्याचा घेतला ऐतिहासिक निर्णय
संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावातील चिंचवलकरवाडीने लग्नातील अनिष्ट आणि खर्चिक प्रथांना थारा न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. स्थानिक ग्रामस्थ, मुंबईतील रहिवासी आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. विशेष म्हणजे, हळदीच्या कार्यक्रमात दारू देण्याची प्रथा तात्काळ बंद करण्यात आली असून, नियम मोडणार्यांच्या लग्नसमारंभात गावकरी सहभागी होणार नाहीत, असेही ठरवण्यात आले.
बैठकीत लग्न सोहळ्यातील विविध प्रथांना बंदी घालण्यात आली यामध्ये लग्नाचा बस्ता घ्यायला फक्त घरातील सदस्य आणि वाडीतील एक-दोनच व्यक्ती जातील. घरबघणीच्या कार्यक्रमात जेवणाचा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी ही प्रथा रद्द करण्यात आली. लग्नाच्या आदल्या दिवशी होणार्या हळदीत दारू व मांसाहारास सक्त मनाई करण्यात आली. जर लग्न मुंबईत असेल, तर हळदीला फक्त शेजारी-मित्र यांनाच बोलावायचे. हळद उतरवणी कार्यक्रमातही दारूला बंदी घालण्यात आली आहे. स्यिम मोडल्यास गावकरी लगकार्यात सहभागी होणार नाहीत.
www.konkantoday.com




