वीज बिलांची थकबाकी चिंताजनक, आता कठोर कारवाई शिवाय पर्याय नाही. मुख्य अभियंता श्री देवेंद्र सायनेकर
कोकण परिमंडळ अंतर्गत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. या दोन्ही जिल्ह्यांची मिळून वीज ग्राहकांची संख्या केवळ 904865 आहे. परंतु तरीदेखील त्यातील 325057 ग्राहकांनी आपले वीज देयक वेळेवर भरणा करणे टाळले असल्याचे समोर आले आहे.
या वेळी रत्नागिरी जिल्ह्यातील 176004 ग्राहकांनी आपले वीज बिल भरलेले नाही. यामध्ये खेड विभागातील 43467 ग्रहकांकडे 14 कोटी 36 लक्ष रुपये रक्कम चिपळूण विभागात 43242 वीज ग्रहाकांकडे 15.38 कोटी रुपये तर रत्नागिरी विभागातील 89295 वीज ग्रहाकांकडे 27.62 कोटी रुपये एवढी रक्कम थकीत आहे. यामुळे एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात 57 कोटी 37 लक्ष रुपये एवढी प्रचंड थकबाकी येणे राहिली आहे.
महावितरण कंपनीने वीज देयके अचूक मिळण्यासाठी एसएमएस, मोबाईल ऍप तसेच वेबसाईट मार्फत मीटर रीडिंग अपलोड करण्याची सुविधा दिली आहे. तरीदेखील निर्माण होणाऱ्या वीज देयकातील दुरुस्त्या तत्काळ करण्याचे अधिकार आता स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. यामुळे कोणत्याही परिस्थितीत एकही तक्रार प्रलंबित राहू नये असेही आदेश सर्व उपविभाग प्रमुख यांना देण्यात आले आहेत.
सध्या असलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना घरच्या घरीच देयक भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून ही पद्धत अत्यंत सुटसुटीत आणि सहज सुलभ करण्यात आली आहे. यामुळे ग्रहकांनी आपली वीज पुरवठा देयके वेळेत भरणा करणे आवश्यक आहे.
महावितरण कंपनीला सातत्याने दोन वर्ष आलेल्या निसर्ग आणि तोक्ते वादळामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशा परिस्थितीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू ठेवणे आता शक्य नसल्याचे मुख्य अभियंता श्री देवेंद्र सायनेकर यांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे थकीत वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्थानिक कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर नाईलाजास्तव कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी नमूद केले आहे. यामुळे सध्या तरी वीज देयक भरणा करणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे.
www.konkantoday.com