राजापुरात दुसऱ्या जागी रिफायनरी प्रकल्प उभा राहत असल्याने त्याला काँग्रेसचा पाठिंबा
काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेसोबतची बांधीलकी जपून आहे काँग्रेसने स्थानिक जनतेची मागणी लक्षात घेता नाणार भागात प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र, आता शून्य विस्थापन असलेल्या बारसू-सोलगावच्या जागेत रिफायनरी प्रकल्प उभा राहत असल्याने त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल, असे काँग्रेस नेत्या आणि माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी केले आहे.
आता शून्य विस्थापन असलेल्या बारसू – सोलगांवच्या जागेत तालुक्यासह स्थानिक जनतेलाच प्रकल्प हवा असल्याने काँग्रेस पक्षाने याठिकाणी प्रकल्पाचे समर्थन करीत पुन्हा स्थानिक जनतेसोबत राहण्याची पक्षीय भूमिका घेतल्याचे रोखठोक घेतली आहे .संकुचित विचार न करता काँग्रेस पक्षाने नेहमीच देशाच्या हिताचा विचार केला आहे. अशा प्रकल्पांची फळे आज देश चाखत आहे . त्यामुळेच यापूर्वी मतांच्या आकडेवारीला नगण्य स्थान देत काँग्रेसने अणुउर्जा प्रकल्पाचे समर्थन केले होते . आज अणुउर्जा प्रकल्पातील ९ ८ टक्के जनतेने आर्थिक मोबदला स्वीकारलेला आहे .
मात्र प्रकल्पांना विरोध करून मतांची बेगमी करून सत्ता पटकावणारे आजही तालुक्याचा कोणताच विकास करू शकलेले नाहीत . देशहिताची त्यांच्याकडून अपेक्षा करणे तर गैरच आहे असे मत सौ.खलिफे यांनी व्यक्त केले .
www.konkantoday.com