मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन

मुंबई गोवा महामार्गा वरील खड्ड्यांच्या संदर्भात लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अजित यशवंतराव यांच्या नेतृत्वाखाली काल रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. त्यावेळी महामार्ग क्रमांक 66 वर दुतर्फा ट्रॅफिक झाले. या ट्राफिक मध्ये लांजा वरून रत्नागिरी मध्ये रूग्ण घेऊन जाणारी ॲम्बुलन्स अडकली होती. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन दाखवत सदर ॲम्बुलन्स ला मार्ग मोकळा करून दिला. या आंदोलनाच्या वेळी जिल्हा सचिव अभिजित राजेशिर्केयांनी हे आंदोलन जनतेसाठी केले असल्याचे सांगितले.

या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा म्हणून विविध संस्था संघटना तसेच विविध कार्यकर्ते यांनी एकत्रित येण्याची तयारी दर्शवली. रस्त्यावर प्रवास करताना वाहन चालक व महिला त्यांना होणारा त्रास पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या आंदोलनाचे सर्वांनी कौतुक केले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button