तर या निवडणुकीत नागरिक पाठीवर शब्बासकीची थाप नव्हे, तर रट्टे मारतील, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी कुणाला दिला हा इशारा
रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत मी तिसऱ्या क्रमांकावर गेलो असे म्हणणाऱ्या बंड्या साळवींनी तेव्हा पोटनिवडणुकीत काय केले ते सर्वांना माहिती आहे. भाजपच्या एका नेत्याने मंत्री सामंत यांच्याबरोबर बैठक घेतली. तेव्हा हिंदु मते भाजपने आणि मुस्लिम मते शिवसेनेने टार्गेट करण्याची रणनिती ठरली. शेवटच्या तीन दिवसात भाजपने अर्थकारण करून माझी अडीच हजार मते घेतली. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आता परिस्थिती वेगळी आहे. या निवडणुकीत नागरिक पाठीवर शब्बासकीची थाप नव्हे, तर रट्टे मारतील, असा पलटवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केला.
येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, पोटनिडणुकीत मला आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला बंड्या साळवी यांनी दिला होते. मी ते केले आहे. आमदारांनी खोटे बोलून आपण विजयापर्यंत पोहचु शकला. दुसरे म्हणजे, आमदारांनी त्यांचे जेष्ठ सहकारी भाजप निवासी मुंबईस्थित एक नेत्या बरोबर चार दिवस अगोदर बैठक घेतली. त्यामध्ये रणनिती ठरली की मिलिंद कीर यांच्या भागातील हिंदु मते भाजपने तर मुस्लिम मते शिवसेनेने टार्गेट करायची. भाजपने शेवटच्या तीन दिवसात अर्थकारण करून माझी अडीच हजार मते घेतली. शिवसेनेने राष्ट्रावादीच्या पाच नगरसेकापैकी चार नगरसेवक आपल्याबरोबर घेऊन माझी मते घेतली. त्यामुळे मी तिसऱ्या क्रमांकावर गेलो. तेव्हा पोलिस रिपोर्ट मिलिंद कीर निवडुन येतील असा होता. भाजपचे अठरा आजी, माजी आमदार, खासदार,पक्षांचे प्रदेशाध्यक्ष, विधानपरिषदेचे सदस्य, महिला आघाडीच्या प्रमुख, स्थानिक सात नगरसेवक अशी मोठी टीम प्रचारात उतरली होती.
शिवसेनेने देखील १९ नगरसेवक, २ स्वीकृत नगरसेवक , राष्ट्रवादीचे चार नगरसेवक, पंचवीस नगरसेवक शिवसेनेचे काम करीत होते. खासदार आणि आमदार प्रचारात उतरले होते. तरी सुद्धा फार कमी मताने माझा पराभव झाला. माझ्याबरोबर ग्रामस्थ, मित्र, मंडळी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची , आघाडीची फळी होती. त्यामुळे अन्य उमेदवारांच्या तुलनेत चांगली मते मिळाली हे शिवसेने, भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी खासगीत सांगितले. त्यामुळे मी हरूनही जिंकलो आहे. माझे कर्तव्य आहे की पालिकेत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी जनतेसमोर आणण्याचे ते मी काम प्रामाणिक करीत आहे. मात्र तुम्ही काय करताय ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला. त्यांना रस्ते बघुन पश्चाताप होईल, अशी तुमची भुमिका आहे. रस्त्यांसाठी ६० कोटी मंजूर झाल्याचे सांगितले. मात्र त्याचा प्रस्ताव गेला आहे का?, ८३ कोटीच्या डीपीआरला सर्वसाधारण सभेची मंजूरी आहे का?शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे का, याची उत्तरे द्या आणि मग बाकीच्या गोष्टी करा, असे कीर यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com