आमदार भास्कर जाधव यांच्या सूचक इशाऱ्यामुळे त्या उद्योजकाची चांगलीच तंतरली!
खेड: लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये वारंवार होणारे जीवघेणे अपघात, प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा निर्माण होणारा प्रश्न याकडे आपण तितकेसे लक्ष दिले नव्हते मात्र आता काही गोष्टी आपल्या पूर्णपणे लक्षात आल्या असून यापुढे लोटे औद्योगिक वसाहतीत बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करण्याची वेळ आली आहे असे सूचक विधान करत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी नागरिक आणि कामगारांच्या जिवाशी खेळणाऱ्या उद्योजकांना गंभीर इशारा दिला आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, लोटे औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार प्रदूषणाबाबत योग्य ती खबरदारी घेत नसल्याने या परिरातील नागरिकांच्या प्रदुषणाबाबतच्या अनेक तक्रारी आहेत. कारखान्यांमध्ये तयार होणारे विषारी सांडपाणी उघड्या नाल्यात सोडले जात असल्याने शेतकन्यांची पाळीव जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. कारखान्यामध्ये उत्पादन घेताना सुरक्षेबाबत योग्य खबरदारी घेतली जात नसल्याने अनेक जीवघेणे अपघात होवून
कामगारांच्या जीवावर बेतले आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीच्या सांडपाण्यामुळे दाभोळ खाडीत जलप्रदुषण होवून मासेमारीचा व्यवसाय पुर्णपणे संपुष्टात आला आहे. या विरोधात मच्छिमार व्यवसायिकांनी अनेक आंदोलन केली मात्र इथे केवळ पैसे कमविण्याच्या उद्देशाने आलेले कारखानदार मच्छिमारांची आंदोलने चिरडण्याचे काम करत आहेत. गेल्या काही वर्षात या औद्योगिक वसाहतीत अनेक गोष्टी
बिघडलेल्या आहेत. त्या दुरुस्ती करायची वेळ आता आली आहे.
आपर्यत या औद्योगिक वसाहतीशी माझा संबध तसा नगण्य राहिला आहे. मात्र आता जातीने लक्ष द्यायची वेळ आली आहे. आमदार भास्कर जाधव यांच्या या सुचक इशाऱ्यामुळे निष्काळजीपणे वागणऱ्या उद्योजकांची चांगलीच तंतरली आहे.
www.konkantoday.com