रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी बस स्थानकातील बहुसंख्य दूरध्वनी नादुरूस्त
रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी स्थानकातील बहुसंख्य दूरध्वनी बंद अवस्थेत असल्यामुळे प्रवासी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत एसटी प्रशासनाकडे चौकशी केली असता एसटी प्रशासनाकडून वेळोवेळी बीएसएनएलकडे तक्रार करूनही त्यासंदर्भात उपाययोजना केली जात नसल्याने हे दूरध्वनी बंदच असल्याचे बोलले जात आहे.
www.konkantoday.com