
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा ढग गडद होत असताना आता कायम जनतेमध्ये असणारे नेतेमंडळींनाही कोरोनाची लागण
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या रोजच वाढत आहे. एकीकडे संसर्ग वाढत असताना कोरोनाचे नवे रुप ओमिक्रॉनचादेखील धोका वाढला आहे.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा ढग गडद होत असताना आता कायम जनतेमध्ये असणारे नेतेमंडळींनाही कोरोनाची लागण होताना दिसत आहे. सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात अशा बड्या नेत्याना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉन विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता आता युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. फेसबुकद्वार त्यांनी ही माहिती दिली आहे.
www.konkantoday.com