मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडले,वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी घेतली भेट
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी भेट घेतली व कोकणातील महामार्गासह महत्वाच्या रस्ते प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली.
रायगड जिल्ह्यातील माणगांव, महाड, पोलादूर तालुका व रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात भूसंपादनाच्या समस्येमुळे मुंबई-गोवा एनएच-६६ च्या चौपदरीकरणाच्या कामावर परिणाम होत आहे. डिसेंबर २०२० पासून निधी वितरण प्रक्रिया थांबली असून यामुळे कामाच्या प्रगतीवर परिणाम झाला आहे. हे ना. गडकरींच्या खा. तटकरे यांनी लक्षात आणून दिले.
www.konkantoday.com