
कॉन्व्हेन्ट शाळेने तत्काळ फी मध्ये सवलत द्यावी: काँग्रेसअल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन
कॉन्व्हेन्ट शाळेने तत्काळ पालकांना फी मध्ये सवलत द्यावी अशी मागणी काँग्रेस नेते व काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यांनी केली आहे.
हारीस शेकासन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कॉन्व्हेन्ट प्रशासनाशी चर्चा केली.
सरसकट सर्वच पालकांना सवलत देण्याची केली हारीस शेकासन यांनी मांगणी यावेळी केली.
आर्थिक अडचणीत असलेल्या पालकांना सवलत देण्याचे कॉन्व्हेन्ट शाळेने या वेळी तोंडी आश्वासन दिले.
या शिष्टमंडळा मध्ये रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यांच्या बरोबर काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस बंडू सावंत, दीपक राऊत, सुष्मिता सुर्वे, सुहेल शेख, अश्फाक झारी, रिझवाना शेख, खालिद तांबे व इतर पालक उपस्थित होते.
www.konkantoday.com